Share

ना ऑक्सिजन ना व्हेंटिलेटर.. लातूरची परिस्थिती चिंताजनक

Published On: 

लातूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यभरात चांगलाच हैदोस घातला आहे. कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र लातूरमध्ये बघायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण देखील बंद होते. लसीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात ५० हजार लातूरकरांना लस देणारं लातूर आज हतबल झालं आहे.

शहरात शासकीय, खाजगी रूग्णालयांत व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचे बेड मिळने अवघड झाल्याने रूग्णांचे नातेवाईक परेशान असून, त्यांची कुठे बेड मिळेल का, यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र शहरात बघायला मिळत आहे. कोरोना बाधित रूग्णांची संख्याच मोठी असल्याने सर्व शासकीय, खाजगी रूग्णालयांच्या यंत्रणा तरी काय करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचे बेडच शिल्लक नाहीत तर नव्याने येणाऱ्या रूग्णांना कुठून सुविधा द्यायची, अशी अडचण होत आहे. शहरातील तरूण कोरोना बाधित रूग्ण देखील अक्षरश: व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडसाठी वेटिंगमध्ये असून, डॉक्टर आणि आरोग्य खात्यातील कर्मचारी तरी काय करणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने हे भयावह चित्र निर्माण झाले असून, दररोज शेकडो कोरोना बाधित रूग्ण तपासणीतून पुढे येत आहेत. प्रत्येकांना सुविधा तर दिले जात आहे. पण जे अगोदरच व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर आहेत, त्यांना दूर करून नव्याने आलेल्या रूग्णांना सुविधा देणे हे देखील उच्चित नाही. अशा परिस्थितीत रुग्णांचे हाल होत आहेत त्याच सोबत येथील प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!