🕒 1 min read
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशभरात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता देशात म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेसने भापला आणि केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. म्युकरमायकोसिसचा सामना करताना केंद्र सरकारच्या तयारीवरुन काँग्रेसनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या महामारीपासून वाचण्यासाठी सरकार काय मार्ग आखत आहे? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी विचारला आहे.
महामारीविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारनं काय तयारी केली आहे? याचं उत्तर द्यावं. कोरोना विषाणू आणि काळ्या बुरशीविरोधात लढण्यासाठी सरकारने काय होमवर्क केलाय? फक्त भाषणबाजी करुन काही होणार नाही. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींकडून कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊस उचलल्याचं पाहायला मिळत नाही’, अशा शब्दात वेणुगोपाळ यांनी मोदींवर हल्ला चढवलाय. काळ्या बुरशीविरोधात लढण्यासाठी सरकारचं काय नियोजन आहे? यावरील औषधांचाही मोठा तुटवडा असल्याचं डॉक्टर सांगत असल्याचंही वेणुगोपाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हा आजार झालेल्या रुग्णांना एम्फोटेरीसीन बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. याचाच अर्थ देशभरामध्ये या इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- आता ‘या’ जिल्ह्याला मिळणार दिलासा ! पालकमंत्र्यांनी घेतला कडक लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय
- ‘नटून व ब्रँडेड बूट घालून पाहणी करणाऱ्यांना मुंख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बोलण्याचा अधिकार नाही’
- पीएम केअरच्या बंद व्हेंटिलेटर्सला चालू म्हणून दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव? -आ. सतिश चव्हाण
- पुण्यात आजही नव्या रुग्णांचा आकडा १ हजाराच्या आत, तर ऍक्टिव्ह रुग्णांच्या आकड्यातही घट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
