Share

पीएम केअरच्या बंद व्हेंटिलेटर्सला चालू म्हणून दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव? -आ. सतिश चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पीएम केअर फंडातून हिंगोली जिल्हा रूग्णालयाला ज्योती सीएनसी कंपनीचे १५ व्हेंटिलेटर देण्यात आले होते. त्यातील सगळीच व्हेंटिलेटर वापरात असल्याचे पत्र हिंगोली जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आ.सतीश चव्हाण यांना दिले. यांनी गुरुवारी (दि.२०) प्रत्यक्षात हिंगोली जिल्हा रूग्णालयास भेट देऊन या व्हेंटिलेटरची पाहणी केली असता यातील एकच व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर वापरले जात असल्याचे पाहिले. अशाप्रकारे चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांची पोलखोल केली.

पीएम केअर फंडातून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयास मिळालेल्या १०० व्हेंटिलेटरपैकी १५ व्हेंटिलेटर हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयास वापरासाठी देण्यात आली होती. त्यापैकी सध्या किती व्हेंटिलेटर वापरात आहेत?, किती बंद अवस्थेत आहेत?, असे प्रश्न उपस्थित करून याचे लेखी उत्तर मला त्वरित कळविण्यात यावे असे पत्र आ.सतीश चव्हाण यांनी १९ मे रोजी हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद येथील जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी सर्व १५ व्हेंटिलेटर वापरात असल्याचे सांगितले.

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयास आ.सतीश चव्हाण यांनी भेट देऊन या व्हेंटिलेटरची पाहणी केली. यातील फक्त एकच व्हेंटिलेटर वापरात असून तेही बायपॅप मोडवर वापरले जात आहे. त्यातूनही ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होत नसल्याने त्याला अन्य स्त्रोताने अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी वस्तुनिष्ठ तपशील देण्याची मागणी चव्हाण यांनी डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांच्याकडे केली.

सुर्यवंशी यांनी आ.सतीश चव्हाण यांना पुन्हा एक पत्र दिले. या पत्रात १५ पैकी २ व्हेंटिलेटर सुरू होत नाहीत, उर्वरीत १३ व्हेंटिलेटरला पुरेशा दाबाने ऑक्सिजन पुरवठा देऊन कार्यान्वित केले असता त्यामध्येे एअर आणि ऑक्सिजन सप्लाय फेल्ड असा मॅसेज दिसून येत आहे, सर्व व्हेंटिलेटरर्सला बॅटरी बॅकअप पुरेसा नाही, यापैकी दोन व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर वारपले असता त्यास अन्य स्त्रोत्राने अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागत असल्याचे नमूद केले.

व्हेंटिलेटर वापरण्यायोग्य नसल्याचे माहित असतांनाही ते वापरण्याचा अट्टाहास आरोग्य यंत्रणेकडून का केला जातोय असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला. हे व्हेंटिलेटर वापरासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेवर कुणाचा दबाव येत असेल तर राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची देखील उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!