Share

भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन

Published On: 

हुबळी : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,91,331 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन हा ७ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 24 मे पर्यंत राज्यात क़डक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे 7 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद येत आहे.महाराष्ट्र राज्यावरील कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!