Share

आता ‘या’ जिल्ह्याला मिळणार दिलासा ! पालकमंत्र्यांनी घेतला कडक लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय

Published On: 

नाशिक : राज्यासह देशभरात कोरोनाच्या सऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला असताना अनेक जिल्ह्यात मागील काही आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये वा शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सुमारे अर्धा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाऊनच्या गर्तेत गेल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये बांधितांची संख्या पुर्णत: कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेवून 12 मे 2021 रोजी दुपारी 12:00 पासून 23 मे 2021 पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती.

आज नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली असून नाशिककरांना काही दिलासा मिळणार कि कडक लॉकडाऊन लागू राहणार याकडे लक्ष लागलं होतं. नाशिक शहरासह जिल्ह्यातील रुग्णसंख्येत होणारी घट व कोरोना मुक्तांचा वाढत आकडा लक्षात घेता कडक लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्य सरकारच्या ब्रेक दी चेनचे निर्बंध कायम राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकचा कडक लॉकडाऊन 23 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार, तर 24 तारखेपासून राज्य सरकारच्या ब्रेक दी चेनचे निर्बंध कायम राहणार आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!