🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.
तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी 3 दिवस पाहणी दौरा केला आहे. या दौर्यावर्ती राज्याचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते कि, ‘विरोधकांना दौरा करायचा ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत. पंचनाम्याच्या आधारावर मदत जाहीर होते. किती किलोमीटर गेले, पायी किती गेले, किती दौरे केले हे आम्ही विरोधकांना विचारत नाही. विरोधक फिरत असताना दोघांचे एकसारखेच होते. बूट एकसारखे घालतात, बूट खरेदी करतात, बूट नवे खरेदी करावे लागतात. यांचे बूट Nikeचे की Pumaaचे हे ठाऊक नाही पण नटून जात आहे. मुंख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही,’ अशा शब्दात नवाब मलिक यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीका केली आहे.
तसेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रामधून पंतप्रधान मोडी आणि त्यांच्या केंद्र सरकावर सडकून टीका केलेली आहे. ‘ पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला हजार कोटी दिले म्हणून बोटे मोडायचे कारण नाही . मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देत असते याचे भान ठेवून दिल्लीश्वर कोकणातील वादळग्रस्तांसाठी दोनेक हजार कोटी देतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे ?’ असा सवाल त्यांनी त्यांची आजच्या अग्रलेखातून विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम केअरच्या बंद व्हेंटिलेटर्सला चालू म्हणून दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव? -आ. सतिश चव्हाण
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांच्या समाधी स्मारकाचे संवर्धन करण्याची, आ. दानवेंची मागणी!
- १८ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी आता अजित पवारांनी दिला शब्द, म्हणाले…
- ‘सुरक्षित वातावरणात १० जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे’
- ऐश्वर्याला प्रपोज करणाऱ्या चाहत्याला अभिषेक बच्चनने दिले हटके उत्तर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
