Share

५G प्रकरणात दिलासा नाहीच! दंड रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा जुही चावलाची हायकोर्टात याचिका

Published On: 

मुंबई : भारतात 5G टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने थेट भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान या प्रकरणी अभिनेत्री जुही चावला आणि अन्य दोन जणांना दिल्ली हायकोर्टाने 20 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही रक्‍कम भरण्यासाठी हायकोर्टाने जुही चावला आणि अन्य दोन जणांना एक आठवड्याची मुदत दिली आहे. कायद्याचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत तिला हा दंड दिल्ली हायकोर्टाकडून करण्यात आला होता. कोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीची लिंक जुहीने सोशल मीडियात टाकल्याने ही कारवाई करण्यात आली होती. केवळ प्रसिद्धीसाठी तिने ही याचिका दाखल केल्याचं कोर्टाने म्हटलं होत.

या प्रकरणात जुही चावलाचे वकील मित मल्होत्राला यांनी म्हटले होते की, सदरचा दंड हा कोर्टाने रद्द करावा. या विरोधातही याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली असून, दंड भरण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला होता. या दंडाच्या विरोधात जुहीने पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु जुहीची ही याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावत तिला दंड भरण्यास सांगितला आहे. आता या याचिकेवरील दुसरी सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!