श्रीलंका : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा हा सुरुवातीपासुनच अडचणीत सापडत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्ध मालिकेसाठी नवा संघ उभा करण्यात आला. यादरम्यान श्रीलंकेच्या नव्या संघातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली होती.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही मालिका आधीच ५ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे निर्धारित कार्यक्रमानुसार ही मालिका १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरु होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या सुधारित वेळापत्रकानंतर श्रीलंका क्रिकेटने दोन्ही संघात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नवीन वेळा देखील शेअर केल्या आहेत.
#SLvIND pic.twitter.com/LQSJT5tDmM
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 12, 2021
श्रीलंका क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शिखर सामन्यांच्या वेळेत बदल झाल्याचे समोर आले आहे. श्रीलंका क्रिकेटच्या पोस्टनुसार, द्विपक्षीय मालिकेतील वनडे सामने दुपारी 2:30 ऐवजी दुपारी 3 वाजता सुरू होतील. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने रात्री 8:00 वाजता सुरु होतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ”सत्यमेव जयते’ मधून मोठमोठ्या गोष्टी सांगतो आणि स्वतःवर वेळ तेव्हा…’ ; लडाखमधील गावकऱ्यांची आमिरवर टीका
- मी स्वतःला जगातील सर्वोत्तम टेनिसपटू मानतो : जोकोविच
- ‘योगींनी दोन मुलांऐवजी जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे’
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

