Share

आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई- महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याकडून पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ शिवसेनेनेही पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांना काही बोलायचं असेल तर खासगीत बोलावे, चव्हाट्यावर बोलू नये, असा सल्लाच शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी दिला आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, ‘नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचं आहे ते त्यांनी खाजगीत बोलावं चव्हाट्यावर बोलू नये’ असे खडे बोल सुनावत सावंत यांनी पटोले यांना सुनावले आहे.

पुढे बोलताना दे असेही म्हणाले की, ‘तुम्हाला काही अडचण आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा; पण असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. त्यांना कसं थांबवायचं हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील.’

अरविंद सावंत म्हणाले, की तुम्हाला काही अडचण असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगा. पण असे वक्तव्य करणे योग्य नाही. आपल्या वक्तव्यांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही. याचा विचार केला पाहिजे, त्यांना कसं थांबवायचं हे आता त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी पुस्ती सावंतांनी जोडली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!