नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर गेले होते. तीन दिवसांचा अमेरिका दौरा करून पंतप्रधान मोदी आज मायदेशी भारतात परतले आहेत. अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश असलेल्या क्वाड परिषद झाल्यानंतर मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची देखील दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. तर, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मोदी यांनी काल भाषण केले.
यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासह कोरोना महामारी, आंतरराष्ट्रीय प्रश्न, आतंकवाद, भारताचे महत्व अशा विविध विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, मोदींच्या कालच्या भाषणावर काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. ‘मोदींच्या भाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत,’ असा खोचक टोला चिदंबरम यांनी लगावला आहे.
I was disappointed that only a few seats were occupied when PM Modi addressed the U N General Assembly
And even more disappointed that no one applauded
INDIA’s Permanent Mission at the UN has goofed up massively
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 26, 2021
पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ‘जेव्हा पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित केले, तेव्हा मी खूप निराश झालो की फक्त काही जागा भरल्या गेल्या आणि जेव्हा कोणीही टाळ्या वाजवल्या नाही तेव्हा ते आणखी निराशाजनक होते. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमचे मिशन विस्कळीत झाले आहे,’ असा घणाघात चिदंबरम यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मस्ती चढलेल्या आमदारावर गुन्हा दाखल करा, नाहीतर…; मनसेचा आक्रमक इशारा
- ‘…नाही तर तुमच्या शिवाय’; आगामी निवडणुकांमधील आघाडीवरून राऊतांचा एल्गार
- ‘…तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- युपीएससी परिक्षेत औरंगाबादचा झेंडा; शिवसेनेकडून अनिकेतचा सत्कार!


