औरंगाबाद : शहरातील वाॅर्ड क्र. ६२ एन-६, संभाजी कॉलनी सिडको येथील अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी या विद्यार्थ्याने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात ५१७ वा क्रमांक मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने रोहयो मंत्री संदिपान भुमरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी त्याचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच या यशामुळे औरंगाबाद शहराच्या इतिहासात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला असून अनिकेत कुलकर्णी याचे कौतुक करून पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
आयआयटीत प्रवेश घेतल्यानंतर आयएएस परीक्षेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने दुसऱ्या वर्षापासून अनिकेतने अभ्यास सुरू केला. त्याने केवळ स्वप्न पाहिले नाही तर ते पूर्णही करुन दाखवले. मुलाने आयएएस परीक्षेत देशात ५१७ वा रँक मिळविल्याचा आनंद संपूर्ण कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. शहरातील सिडको एन-६ मधील संभाजी कॉलनीत लक्ष्मीकांत कुलकर्णी यांचे कुटुंब राहते. एका खासगी कंपनीत काम करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
त्याचे प्राथमिक शिक्षण ओम प्राथमिक प्रशालेत तर माध्यमिक शिक्षण सिडको एन ५ मधील धर्मवीर संभाजी विद्यालयात झाले. त्यानंतर पटना येथील आयआयटीत प्रवेश मिळविला. आयआयटीमध्ये प्रवेश दुसऱ्या वर्षापासून त्याने आयएएसची तयारी सुरू केली. पहिल्यांदा त्याने २०१९ मध्ये परीक्षा दिल्यानंतर त्याने मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र, पहिल्याच अपयशाने खचून न जाता पुन्हा जोरदार तयारी सुरू केली होती. अखेर २०२१ च्या अंतिम परीक्षेत मोठे यश संपादन कले. याप्रसंगी संभाजीनगर पूर्व विधानसभा संघटक रेणुकादास वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपशहरप्रमुख सुरेश कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संज्या ते पवार कुटुंब; वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देतील आणि पाठीमागे तिरडी सुद्धा बांधतील’
- प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे, फक्त भाजपा किंवा आरएसएसचे नाही- फारूख अब्दुल्ला
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

