औरंगाबाद: ७ नोव्हेंबर पासून सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजपर्यंत सुरू आहे. निलंबन, सेवा समाप्ती, बदली, पगारवाढ या सर्व कारणांमुळे रुजू झालेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर जिल्ह्यातील काही भागात एसटी धावत आहेत. मात्र अजून पर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झालेल्या नाही. गेल्या दोन दिवसात एकही नवीन कर्मचारी रुजू झालेला नाही. शनिवारी (दि. २५) ९४ बसच्या ३२७ फेऱ्या झाल्या असून ४७९० प्रवाशांनी एसटीने प्रवास केला.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण यांसह इतर मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दीड महिन्यापासून संप सुरू केलेला आहे. राज्य शासनाकडून पगारवाढ देण्यात आली मात्र कर्मचाऱ्यांनी दिलेली ही पगारवाढ नाकारत विलीनीकरण हवे या मुद्द्यावर आपला संप अजून पर्यंत सुरू ठेवलेला आहे. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एक समिती नेमून या समितीस प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
२० डिसेंबर रोजी या संदर्भात पहिली सुनावणी झाली. त्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयाकडून २२ तारीख देण्यात आली. त्यानंतर आता ५ जानेवारी ही तारीख पुढील सुनावणीसाठी देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांचेही लक्ष ५ जानेवारीकडे लागलेले आहे. न्यायालयाकडून काय निर्णय घेतला जातो त्यानंतरच संपकरी देखील आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. तोपर्यंत संपावर कायम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- “मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय या सरकारने”, सदाभाऊंचा हल्लाबोल
- ‘शिवसेनाप्रमुख कोण होते, तेही सांगून टाका?’, भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
- “ऑक्सिजन प्लांट सज्ज करण्याच्या काळात झोपा काढल्या…”, भातखळकरांची टोपेंवर टीका
- ‘खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले’, शिवसेना आ.चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
- “नवाब मलिक स्वतःला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश समजतात काय?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

