Share

ज्याने विश्वास ठेवला, त्याचाच घात केला; कर्ज फेडण्यासाठी सोने व्यापाऱ्याला कारागिराचा ४० लाखांचा गंडा

Published On: 

औरंगाबाद : श्रीनिकेतन कॉलनी भागात भव्य दालन असणाऱ्या नामांकित सोने व्यापाऱ्याला त्याच्याकडेच २५ वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या कारागिराने परस्पर सोन्याची दिलेली तब्बल ८४ तोळे सोन्याची लगड लांबवत, व्यापाऱ्याला स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी ४० लाखांचा गंडा घातला. अमरचंद प्रेमराज सोनी वय ४४ रा. पंदारीबा असे गंडा घालणाऱ्या कारागिराचे नाव असून उदय सोनी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

लालचंद मंगलदास सोनी जेम्स, ज्वेलरी प्रोडक्ट लिमिटेड या नावाने उदय सोनी यांचे शहरात नामांकित्त सोन्याचे दुकान आहे. अनेक वर्षांपासून अमर सोनी हा त्यांच्याकडून सोन्याची लगड नेऊन दागिने बनविण्याचे काम करतो. एप्रिल २०२० पासून तर मार्च २०२१ पर्यंत हिशोब न झाल्याने उदय सोनी यांनी अमर सोनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने राजस्थानला असल्याची बतावणी मारली. त्यानंतर त्यांनी मी महिन्यात पुन्हा संपर्क केला. त्यावेळी देखील त्याने राजस्थान मध्ये असल्याचे सांगितले.

अखेर जून महिन्यात उदय सोनी यांनी अमर सोनीला दिलेल्या लगडचा हिशोब काढला त्यात त्यांना तब्बल ८४ तोळे सोन्याचा फरक समोर आला. ज्याची किंमत सुमारे ४० लाख आहे. त्यानंतर उदय सोनी यांनी क्रांती चौक पोलीस ठाणे गाठत, अमर सोनी विरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याने हे सोने स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!