Share

‘लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ ?’ चित्रा वाघ संतापल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंड खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला गेला आहे. काँग्रेससह शिवसेनेनं या प्रकरणी टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील टीका करण्यात आल्यांनतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या टीकेनंतर भाजप युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला.

भाजप युवा मोर्चाने सेना भवनावर कूच करताच, शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली. एकमेकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली. पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली होती. या परिसरात बराच काळ तणावाची परिस्थिती होती.

दरम्यान, या राड्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांना इशारे देत असून भाजप नेत्यांनी महिला कार्यकर्त्यांसह इतर कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला गेल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

‘आंदोलन संपले..पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अटक केली त्यानंतर लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलायं पुरूषार्थ? श्री शिवाजी महाराजांचं नाव घेतां…सुभेदाराची सून आठवा आणि तुमचे प्रताप बघा. महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला हा हल्ला मंजूर आहे का? ,’ असा सवाल करत चित्रा वाघ यांनी या मारहाणीचा निषेध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!