नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये केरळच्या मच्छिमारांच्या हत्येप्रकरणी इटलीच्या दोन खलाशांविरूद्ध सुरू असलेला खटला अखेर १० कोटींच्या नुकसान भरपाईनंतर संपुष्टात आणला. इटालीच्या दोन खलाशांनी भारतीय समुद्री हद्दीत प्रवेश करत, केरळच्या दोन मच्छिमारांची हत्या केली होती. त्यांनंतर या दोघांना अटक करण्यात आली होती व त्यांच्याविरोधात खटला देखील सुरू होता.
अखेर काल मंगळवारी ९ वर्षानंतर दोघांविरोधात दाखल केले गेलेले सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाने बंद करण्याचे निर्देश दिले. या अगोदर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून दोन्ही इटालयिन खलांशाविरोधातील खटला बंद करण्याची सर्वोच्च न्यायालयास विनंती केली होती.
मात्र, पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी ही कारवाई सौम्यप्रकारे चालली असल्याचा आरोप करत सोनिया गांधींवर टीका केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर मोदी सरकारने मौन बाळगल्याप्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
या निर्णयानंतर नरेंद्र मोदींचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे. त्यावेळी मोदींनी प्रोपगंडा पसरवला असल्याच्या एका युजरच्या ट्विटला उत्तर देत दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे की, ‘मी याबद्दल सहमत आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल. त्यांना हरवणं अशक्य आहे.’
I agree but along with DEMAGOGY & HYPOCRISY add LIES. He would not only win the Noble Prize but if there was World Championship of LIARS he would always get a Gold Medal. He is just unbeatable!! https://t.co/OL7LSfmoiK
— Digvijaya Singh (@digvijaya_28) June 16, 2021
काय म्हणाले होते मोदी?
फेब्रुवारी २०१२ मध्ये भारताने असा आरोप केला होता की इटलीच्या दोन खलाशांनी भारतीय मासेमारांना मारुन टाकलं. या प्रकरणी तत्कालीन काँग्रेस सरकारने या खलाशांना पकडून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या प्रकरणावरुन नरेंद्र मोदींनी सोनिया गांधीवर टीका केली होती आणि “मॅडम जर एवढ्याच देशभक्त असतील तर त्यांनी या खलांशांना कोणत्या तुरुंगात डांबलं हेही सांगून टाकावं”, असं ट्विटही केलं होतं. तेच ट्विट सध्या व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंची मोठी घोषणा, लवकरच कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश
- ‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
- ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’ ; भाजपाची ठाकरे सरकारवर जहरी टीका
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

