मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या ७२० कि.मी.लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील ४० पेक्षा जास्त समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला असून अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वांना आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आज(११ डिसें.) या मोहिमेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असतांना अमित यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाच्या बाबतीत कसे काम होणार? किनारे बघितले तर लक्षात येईल. आपला समुद्रकिनारा आहे. आपणच साफ ठेवायला हवा. कारण सरकारकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही. सरकारकडे जबाबदारी देऊन आपण बघितलंय काय होतं.’ तसे अस्वच्छतेसंदर्भात बोलत असतांना अमित म्हणाले की ,यासाठी इच्छाशक्ती लागते. गेली २५ वर्ष त्यांच्याकडे महानगर पालिकेची सत्ता आहे, सरकार आहे. पण त्यांच्याकडे दुर्दैवाने इच्छाशक्ती नाही. त्यामुळे या गोष्टी झालेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’शिवसेनेकडे गेली २५ वर्षे महानगरपालिका आहे. त्यांनी यंत्रणा व्यवस्थित राबवली असती, तर दुसऱ्या कुणालाही बीच साफसफाईची गरज लागली नसती. त्यासाठी अगोदर तुमच्या शहरांवर, राज्यावर तुम्हाला प्रेम असायला हवं. कुणी सांगून ते निर्माण होत नाही.’
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक
- ‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’
- मला कोणावरही आरोप करायचे नाहीत पण व्यवस्थेमुळे…- नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

