Share

जनतेच्या हितासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी पर्वा नाही : आमदार रवी राणा

Published On: 

अमरावती : २९ मे २०१७ रोजी पाणीटंचाई प्रश्न व त्याबाबत करावयाच्या उपाययोजने वर चर्चा करण्यासाठी आमदार रवी राणा आपल्या सहकार्यांसोबत जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्याच्या दालनात गेले होते. परंतु त्यांच्या कार्यालयात कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसतांना Ac, पंखे, लाईट सुरू होते. राष्ट्रीय संपत्तीची ही नासधूस व अधिकाऱ्यांची ऐय्याश वृत्ती व बेजबाबदार पणा पाहून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयातील Ac खाली काढला, व प्रतिकात्मक आंदोलन केले होते.

या प्रकरणी तात्कालीन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशन ला आमदार रवी राणा व इतरांविरुध तक्रार दाखल केली होती. गाडगे नगर पोलीस स्टेशन ला कलम ३५३,१४६,१४७,१४८,१८८ अन्वये आमदार रवी राणा, संजय हिंगासपुरे, जि.प सदस्य दिनेश टेकाम, आशिष कावरे, अनुप अग्रवाल, अनिकेत देशमुख, आदीं विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला होता.

या प्रकरणी आज माननीय जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश श्री काळकर साहेब यांच्या कोर्टात आमदार रवी राणा व इतर युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते, या प्रकरणी सर्वांना जामीन मंजूर झाला आहे.

यावेळी आमदार रवी राणा म्हणाले कि, ‘न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. जनता पाण्यासाठी त्रस्त असतांना, पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना काढून प्रत्यक्ष गावोगावी जाऊन आढावा घेण्याऐवजी अधिकारी मस्त आपल्या कार्यालयात बसून Ac ची थंड हवा घेतात व जनतेला वाऱ्यावर सोडतात या संताप जनक वर्तणुकीला वठणीवर आणण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपले कर्तव्य केले आहे असे रवी राणा म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले कि, ‘आपल्या साठी जनता महत्वाची असून जनतेला त्रस्त करणाऱ्या, कामचुकार अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी यावेळी केले. तसेच जनहितासाठी आपण कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असून मस्तावलेल्या अधिकाऱ्यांनी आता तरी सुधारुन जावे व जनतेच्या हितासाठी काम करावे असेही राणा यावेळी म्हणाले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!