🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून जिल्ह्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. गांभीर्य लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी कोविड नियमावलीचे अधिक कटाक्षाने पालन करणे गरजेचे असल्याचे सांगून आता ‘नो मास्क नो लाईफ’ अशा स्थितीपर्यंत परिस्थिती आलेली आहे. समन्वय आणि सतर्कतापूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजनांव्दारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरंसव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सर्व यंत्रणा प्रमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटर व सर्व रूग्णालयांमध्ये अतिरीक्त खाटांची उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने यंत्रणांव्दारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करून घाटीतील गंभीर रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढीव कोरोना रुग्णसंख्येच्या प्रमाणात प्रशासन सर्वतोपरी सर्व यंत्रणांच्या मदतीने सज्ज असल्याचे सांगून शहरासह ग्रामीण भागातही चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून ग्रामीण रूग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत असून जिल्ह्यात एकुण 115 उपचार सुविधा उपलब्ध असून 11763 आयसोलेशन बेड, 2124 ओटु बेड तर 532 आयसीयु बेड, तसेच 300 व्हेंटीलेटर असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध ठेवण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे. लसीकरणासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात तर शहरात 33 ठिकाणी लसीकरणाची सोय केली आहे. तसेच मोबाईल व्हॅनद्वारेदेखील लसिकरणाची सुविधा तयार असल्याचे सांगितले.
पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यावेळी म्हणाले, शहरात 10 मार्चपासून मार्शल लॉकडाऊनचा आदेश काढला आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. आजपासून रात्री आठ पासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात येणार आहे. गरजु लोकांना मास्क वाटप सुरू आहे. कठोर उपाययोजना केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे गुप्ता म्हणाले.
महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी केंद्राच्या सूचनेप्रमाणे चाचण्यांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे सांगून चाचण्यासाठी मोबाईल पथके तयार केली आहेत. चाचणीसाठी एकूण 54 पथके तैनात करण्यात आली आहेत. 20 पेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणांना कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येईल. लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. प्रत्येक दिवशी दहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध करून दिली जात असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.
डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागातील रूग्णांना त्याचठिकाणी उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रूग्णालयांमध्ये अत्यावश्यक सुविधांसह पुरेशी व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामीण भागात 8 हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन असून चाचण्यांची क्षमता हजारापर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच ज्या गावांमध्ये 25 पेक्षा जास्त रूगणसंख्या आहे त्या ठिकाणी कन्टेनमेंट झोन तयार करून मोबाईल व्हॅनव्दारा संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे सांगितले.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गेल्या वर्षाप्रमाणे व्युहरचना आखुन तालुका नाकाबंदी करण्यात येत आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, मास्क, सॅनिटायझरचे वाटप पोलीसांमार्फत, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुरू असून जनतेला आवाहन करण्यासाठी पोलीसांसोबत स्थानिक यंत्रणा अधिकारऱ्यांनीही रस्त्यावर येऊन जनजागृती करण्याबाबत यंत्रणांना सांगितल्याचे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘नितीन राऊत लॅविश रहा, मात्र करोडोंचा खर्च स्वतः केला की सरकारी तिजोरीतून केला हे सांगा’
- खुर्ची धोक्यात?; पवार-देशमुख भेटीत अंबानी स्फोटक प्रकरणाची चर्चा
- कोरोनाचे नियम मोडणाऱ्या क्लासेस विरोधात गुन्हा दाखल
- एसटीच्या फ्रंटलाइन कर्मचारी वर्गाची लसीकरणाकडे पाठ
- कोरोना काळात मनाने कोणतेही उपचार घेऊ नका
- साष्टपिंपळगाव मराठा आंदोलन : उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती पुन्हा एकदा खालावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
