औरंगाबाद :कोरोनाचा कहर ग्रामीण भागातही वाढत आहे. मागील वर्षी शहरातच बाधितांचे प्रमाण जास्त होते, पण यावेळी मात्र अगदी खेडोपाडी रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे येथे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. म्हणूनच साधा सर्दी, खोकला आणि ताप अशी तिन्ही लक्षणे असतील तर अशा लोकांनी मनाने कुठलेही उपचार न घेता त्वरित कोरोनाची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना आवर्जून दिल्या जात असल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या १६०८ झाली आहे. त्यापैकी ५८१ रुग्ण औरंगाबाद ग्रामीणमध्ये आहेत. खुलताबादमध्ये ५४, गंगापूर २१६, सिल्लोड ८५, पैठण ९९, वैजापूर २८८ तर सोयगावमध्ये १० रुग्ण आढळून आले आहेत. यावर खबरदारी म्हणून मास्क लावणे, हात धुणे, अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करा, असे वारंवार सांगितले जात आहे.
संख्या १६०८ झाली आहे. त्यापैकी ५८१ रुग्ण औरंगाबाद ग्रामीणमध्ये आहेत. खुलताबादमध्ये ५४, गंगापूर २१६, सिल्लोड ८५, पैठण ९९, वैजापूर २८८ तर सोयगावमध्ये १० रुग्ण आढळून आले आहेत. यावर खबरदारी म्हणून मास्क लावणे, हात धुणे, अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करा, असे वारंवार सांगितले जात आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही लसीकरणाबाबत अजूनही अनेकांच्या मनात शंका आहे. त्यामुळेच यावर संवादाद्वारे समुपदेशन केले जात आहे. तसेच ग्रामीण भागातही लसीकरण वाढवण्यासाठी जनजागृती केली जात असल्याचेही संतोष कवडे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राची परिस्थिती बनली बिकट, कोरोनाच्या रुग्ण संख्येत होतेय झपाट्याने वाढ
- साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर जॅग्वार देणार कारमध्ये हे खास तंत्रज्ञान
- उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेचे गॉडफादर : नारायण राणे
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- सुरू होता बालविवाह, पोलीस येताच वऱ्हाडींनी ठोकली धुम!


