औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाने जिल्ह्यात अनेक कडक निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी क्लासेसला शिकवणी सुरु ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु असे असतांना देखील कोरोनाचे नियम डावलून अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस सुरू ठेवणात येत आहे. यामुळे शेकडो विद्यार्थी कोणत्याही नियमांचे पालन न करता शिकवणी सुरु ठेवणाऱ्या वाळूज एमआयडीसी परिसरातील दोन क्लासेसच्या संचालकांवर गुरुवार (१८) रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम, शाळा, खासगी क्लासेस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे. असे असताना देखील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिरालगत कृष्णाई कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सकाळी ६.३० वाजता मोरया क्लासेसचे संचालक अमोल मोरे तसेच किरण जाधव हे
क्लासेस घेत हाेते. त्यामुळे या दाेघांविराेधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत क्लासेसचे संचालक मोरे यांच्याशी बोललो असता ते म्हणाले की, मागील आठ महिन्यांपासून रिकाम्या खोलीचे भाडे देत आहे. बंद खोलीत नव्हे तर मोकळ्या टेरेसवर सुरक्षित अंतर ठेवून मी फक्त स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतो. हेतुपूर्वक काही लोक माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राची परिस्थिती बनली बिकट, कोरोनाच्या रुग्ण संख्येत होतेय झपाट्याने वाढ
- साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर जॅग्वार देणार कारमध्ये हे खास तंत्रज्ञान
- उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेचे गॉडफादर : नारायण राणे
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- सुरू होता बालविवाह, पोलीस येताच वऱ्हाडींनी ठोकली धुम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
