Share

खुर्ची धोक्यात?; पवार-देशमुख भेटीत अंबानी स्फोटक प्रकरणाची चर्चा

Published On: 

नवी दिल्ली : मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. ‘नागपुरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी मुंबईतील ताज्या घडामोडींविषयी चर्चा झाली’ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन यांनी भेट घेतल्या नंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानंतर अनिल देशमुखांची खुर्चीही धोक्यात असल्याची चर्चा आहे.

‘आज सकाळी मी दिल्लीत आलो होतो. विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्रींचा येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी मी आलो होतो.

पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांनी साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहिती घेतली.’ असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

‘एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा सर्व तपास करत आहेत. त्यांना राज्य शासनाकडून सर्व मदत आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. याचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्याची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही.

रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई राज्य सरकार करेल’ अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली आहे. गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन धारण केलं असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!