🕒 1 min read
मुंबई : 1 एप्रिल 2022 पासून किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. असे सांगण्यात आले होते. पण असा कोणताही निर्णय केंद्राने घेतला नसल्याचे स्पष्टीकरण भारत सरकारच्या प्रेस एजन्सी इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माध्यमातून दिले आहे. किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेतले तर व्याज हे अदा करावेच लागणार असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
सरकारने सोशल मिडियावरील व्हायरल मेसेजबद्दल भूमिका स्पष्ट केली. पीआयबी ने याबाबत माहिती घेतली असून फॅक्ट चेक केले आहे. हा व्हायरल एसएमएस चुकीचा असल्याचे सांगितले. व याबाबत कोणाला शंका किंवा अडचण असल्यास 918799711259 मोबाइल नंबरवर पाठवू शकता किंवा socialmedia@pib.gov.in इमेल आयडीवर पाठवून अचूक माहिती घेऊ शकता.
केसीसी कार्ड कर्जाची नियमावली –
शेती व्यवसाया संदर्भात शेतकऱ्यांना त्वरित या कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळवता येते. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे कर्ज हे घेता येते. यावर 9 टक्के असा व्याजदर ठरविण्यात आला आहे. तर सरकार यावर 2 टक्केची सूट देते. एवढेच नाही शेतकऱ्यांनी जर वेळेपूर्वीच व्याज अदा केले तर नियमित कर्ज अदा करणाऱ्याला 3 टक्के अशी मिळून 5 टक्केची सवलत शेतकऱ्यांना घेता येते. तर 4 टक्के व्याज भरावेच लागते.
महत्वाच्या बातम्या –
“असल्या वैचारिक लबाडीमुळेच काँग्रेस…”, भातखळकरांचा हल्लाबोल
“अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार…”, महागाईवरून महेश तपासेंचे टीकास्त्र
“मविआ सरकारने संजय राऊतांना स्वातंत्र्यसैनिक घोषित करून…”, भातखळकरांचे टीकास्त्र
“माझ्या पुतण्याला वाचवा” अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या; ‘मनसे’चा पवारांवर निशाणा
INS Vikrant : “लोकांनी आता गप्प बसू नये, जवानांचे शोषण करणाऱ्या…”, संजय राऊतांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
