Share

लालपरीत आता कोरोनाला ‘नो एंट्री’; अँटी मायक्रो डियल कोटिंगमुळे औरंगाबादेतील बस कोरोना मुक्त!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांचे कोरोनापासुन संपूर्णतः संरक्षण व्हावे यासाठी यापुढे औरंगाबाद डेपोतून कोरोना मुक्त बसेस धावतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद विभागातील प्रत्येक बसला अँटी मायक्रो कोटिंग करण्यात आले असून हे दोन महिने कार्यरत राहणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.

सार्वजनिक वाहतुकीतून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर आता एसटी महामंडळाने स्तुत्य असे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व बसेसला अँटी मायक्रो डियल कोटिंग करण्यात येणार आहे. या कोटींगचे काम बॅक्टी बॅरियर इंडिया कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. कोटिंग करण्याचे काम शनिवार रात्रीपासून सुरू करण्यात आले आहेत. हि कोटींग तब्बल दोन महिने राहणार असल्याने या कालावधीत कोरोना मुक्त बसेस धावणार आहेत.

मुदत संपली की पुन्हा कोटिंग करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. या कंपनीला वर्षभराचे कंत्राट देण्यात आले आहे. एका वर्षात चार वेळेस कोटिंग करण्यात येणार आहे. सोमवार पर्यंत ५० बसचे कोटिंग कंपनीने पूर्ण केले आहे. कोटींगचे काम झाल्यानंतर केवळ पंधरा मिनिटात बस मार्गावर धावण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे कोटिंग झालेल्या विविध बस विविध मार्गांवर धावत आहेत. औरंगाबाद विभागातील सर्व बसचे कोटिंग करण्यात येणार आहे. आता प्रवाशांना कोरोनाचा धोका राहणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!