मुंबई : येत्या ६ डिसेंबर रोजी येणाऱ्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनावरही ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूचे सावट आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना मुंबईतील चैत्यभूमीवर येण्यास मनाई करण्यात आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
भातखळकर ट्विट करत म्हणाले, चैत्यभूमीवर या वर्षीही प्रवेश बंदी. दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध. फक्त ठाकरे सरकारमधील सरदार, मनसबदार यांना गर्दीचे नियम लागू नाहीत. अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
चैत्यभूमीवर या वर्षीही प्रवेश बंदी.
दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध. फक्त ठाकरे सरकारमधील सरदार, मनसबदार यांना गर्दीचे नियम लागू नाहीत. pic.twitter.com/w8IwSTFV64— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 1, 2021
गर्दी टाळण्यासाठी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे पालिकेतर्फे यावर्षीही शिवाजी पार्क मैदान परिसरात अनुयायांसाठी तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात येणार नाही. तसेच चैत्यभूमी परिसरात स्टॉल, दुकाने लावण्यासही मनाई करण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात. गेल्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन हा करोनाचा उत्परिवर्तित विषाणू आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?’
- ममता बॅनर्जी-शरद पवार यांची आज भेट; तृणमूल महाराष्ट्र भाजपाला देणार आव्हान?
- ‘हा घ्या पुरावा, हिंदूंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारे हिंदूह्रदयसम्राटांचे वारस’
- ‘२ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’, चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- ‘महाराष्ट्राची प्रकृती बिघडली, राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी ऑपरेशनची गरज’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

