Share

मंत्रिमंडळ बैठकीत ‘पदोन्नती’बद्दल निर्णय नाही, नाराज नितीन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षणावरून महाविकास आघाडीतले मतभेद समोर येत आहेत. यामुळे सरकारला धोका आहे या प्रश्नावर बोलताना नितीन राऊत म्हणाले की, पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत काँग्रेस आग्रही असली तरी सरकारला धोका नाही. सरकार ५ वर्ष चालेल, हा वाद चर्चेतून सोडवला जाईल. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणे म्हणजे मागासवर्गीयांचा विश्वासघात करणे आहे. राजस्थानात काँग्रेसचं सरकार आहे. तिथेही पदोन्नती आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का लागू करू नये असा सवाल नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पदोन्नतीत आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र याबाबत कुठलाही निर्णय आज झाला नाही. यानंतर नाराज असलेले मंत्री नितीन राऊतांसह काँग्रेस महत्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

नितीन राऊत नाराज

मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित याबाबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत चर्चा करून घेणार निर्णय होणार आहे. दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहोचले आहेत. आजच्या बैठकीत निर्णय न झाल्याने नितीन राऊत नाराज असल्याची माहिती आहे. नितीन राऊत माध्यमांशी न बोलताच निघून गेले.

काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल

पदोन्नती आरक्षणावरून महाविकास आघाडीत काँग्रेस सातत्याने आक्रमक पवित्रा घेत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दीड महिन्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्राचीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही त्यामुळे काँग्रेसला योग्य तो विचार करावा लागेल असं मत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!