Share

‘मृतदेहांवरून राजकारण कसे करावे हे ‘या’ गिधाडांकडून शिकावं’, केंद्राचा राहुल गांधींवर पलटवार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात झालेल्या विध्वसांसाठी कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेकदा केंद्रावर देशात फैलावत जाणारा संसर्ग आणि मृत्यूसंख्या या मुद्द्यावरून टीका केली आहे. मात्र, आता केंद्र सरकारने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी केंद्राने पलटवार करताना त्यांच्यावर ‘गिधाड’ शब्दांत निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील करोनाने होणाऱ्या मृत्युंबाबत सरकारी आणि अंदाजित संख्येबाबत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे एक ग्राफिक्स ट्वीटमधून शेअर केले. राहुल गांधी यांच्या या ट्वीटवरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पलटवार केला आहे. काँग्रेसने मृतदेहांवरून राजकारण करू नये, असा सल्ला हर्षवर्धन यांनी दिला. ‘मृतदेहांवरून राजकारण करणं ही काँग्रेसची स्टाइल आहे. जंगलांमधून गिधाडं नाहिसे होत आहेत, पण त्यांचे गुण मात्र माणसात उतरले आहेत’, असं हर्षवर्धन म्हणाले.

केंद्र सरकारचा पलटवार
मृतांच्या नावाने राजकारण करणं काँग्रेसच्या या गिधाडांकडून शिकावं. ‘झाडांवरील गिधाडं सध्या दिसेनासी झाली असली तर त्यांच्यातील ऊर्जा जमिनीवरील गिधाडांमध्ये आल्यासारखं वाटत आहे. राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर जास्त विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधाडांकडून शिकावं असं ट्विट हर्षवर्धन यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोटं बोलत नाहीत पण भारत सरकार बोलतं असं म्हटलं होतं. या वृत्तपत्राने भारत सरकार सांगत असलेले कोरोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!