मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झालेत. एवढ्या कोरोनाच्या संकटातही देशात इंधनाचे दर वाढविले जात आहेत. आज गुरुवारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात २९ पैशांची वाढ केली आहे. दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल २३ आणि डिझेल २७ पैशांनी महागले होते.
त्यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारला निशाणा साधण्यात येत आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी ‘आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे,’ असे म्हणाले होते. २०१५ मधील एका रॅलीतील हा व्हिडिओ आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1397813676552298502
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असं पंतप्रधान २०१५ मध्ये जाहीर भाषणात सांगत होते. आता २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय?’, असा मलिक यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप १ लाख गावांना कोरोनासंबंधी मदत करणार
- ‘भाजप ऐकत नसेल तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’, हर्षवर्धन जाधव यांचा सल्ला
- ‘भाजपने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे सांगत नाहीयेत’
- पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितीन राऊत काँग्रेसमध्ये एकाकी? जेष्ठ नेत्यांची साथ मिळेना
- ‘चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाची उत्पत्ती झाली का?’, अमेरिकेचा पुन्हा एकदा चीनवर संशय


