Share

भाजप १ लाख गावांना कोरोनासंबंधी मदत करणार

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना संकट हाताळण्यावरून चौफेर टीकाचा सामना करत असलेल्या भाजपकडून आपली प्रतिमा सुधारण्याठी प्रयत्न केले जात आहेत. मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता भाजपकडून लोकांमध्ये जाऊन कोरोनासंबंधी मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानुसार जवळपास १ लाख गावापर्यंत मदत पोहचविण्याची योजना बनविण्यात आली आहे. शिवाय मंत्र्यांकडून प्रत्येकी दोन गावांना भेट दिली जाईल, असे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी यांनी ३० मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची पहिल्यांदा शपथ घेतली त्यास ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भव्यदिव्य कार्यक्रमाची आखणी न करत भाजपने थेट लोकांमध्ये जाऊन आभार व्यक्त करण्याची मोहीम आखली आहे. भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रीय आणि राजस्तरीय पदाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरेसिंगद्वारे संवाद साधत कार्यक्रमाची रुपरेखा स्पष्ट केले. नड्डा यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप शासित राज्यातील मंत्र्यांना यासंदर्भात विशिष्ट निर्देश दिले आहेत.

मंत्र्यांना किमान प्रत्येकी दोन गावांना भेट देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच ज्यांना प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसेल अशा मंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय एक लाखांहून अधिक गावांना कोरोनासंबंधीची मदत उपलब्ध करून देण्याची पक्षाची योजना आहे. यामध्ये रेशन, सॅनिटाईझर, मास्क, ऑक्सिमीटर आणि इतर साहित्यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर देशभरात जवळपास ५० हजार रक्तदान शिबिर आयोजन करण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे. पक्ष कार्यकर्त्यांना कुठल्याही भव्य कार्यक्रमाचे आयोजन न करता लोकांमध्ये जावून सेवा करावी. तसेच भाजपला सात वर्षे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल लोकांचे आभार मानावेत, असे नड्डा यांनी गत आठवड्यात प्रदेशध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!