Share

चुकीला माफी नाही! कचरा केल्यामुळे ‘या’ भारतीय क्रिकेटपटुला भरावा लागला दंड

Published On: 

मुंबई : भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणले जाते. तर सचिनप्रमाणे इतर क्रिकेटपटुना समाजात मानाचे स्थान असते. क्रिकेटपटुच्या वागणुकीची समाजाकडुन दखल घेतली जाते. त्यांनी काही चांगल केल तर कौतुक होतं तर चुकीच केल तर त्यांना चाहत्याच्या रोषाला सामोरे जावे लागते.

असाच एक प्रकार भारताचा माजी क्रिकेटपटु अजय जडेजासोबत घडला आहे. उत्तर गोव्यतील नाचिनोला या गावात कचरा केल्यामुळे अजय जडेजाने कचरा केल्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. अल्डोनामध्ये अजय जडेजाचा बंगला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय जडेजाने कचरा बाजुला असलेल्या नाचिनोला गावात फेकला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्या गावच्या संरपंच असलेल्या तृप्ती बांदोडकर यांनी जडेजाला दंड भरण्यासाठी सांगितले. यानंतर जडेजाने कोणताही वाद न करता 5 हजार रुपयांचा दंड भरला.

या प्रकरणाबद्दल सरपंच तृप्ती म्हणाल्या की,’आमच्या गावात कचऱ्याची समस्या गंभिर होत आहे. त्यातच भर म्हणून बाहेरील कचरा गावात येत असल्यामुळे आमच्या समस्येत अधिकच वाढ होत आहे. यावर उपाययोजना म्हणून गावातील युवकांनी कचरा साफ केला त्यात त्यांना एका कचऱ्याच्या बॅगमध्ये अजय जडेजा यांचे नाव होते. यानंतर आम्ही त्यांना यापुढे अस करु नये अशी ताकीद दिली. अजय जडेजा यांनी चुक लक्षात आल्यावर दंड भरण्याची तयारी दर्शवली.’ असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!