कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामापासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील शीतयुद्ध अजूनही सुरूच आहे. जगदीप धनखड़ हे नुकतेच उत्तर बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर निशाणा साधला. राज्यघटना, राज्यपाल आणि केंद्र सरकार यांच्याबाबत इतका राग का आहे? असा सवाल धनखड़ यांनी राज्य सरकारला केला. लोक भीतीमुळे काही बोलत नाही. मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री त्यांच्याकडे गेला नाही. नुकसान भरपाई दिली गेली नाही. कोणाला अटक का केली नाही? स्वातंत्र्यानंतर कोठेही असा हिंसाचार झालेला नाही, असे धनखड़ म्हणाले.
राज्यपालांच्या या टीकेनंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांवर मोठा आरोप करत, ते भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. असे राज्यपाल यापूर्वी कधी पाहिले नव्हते, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
राज्यपाल जगदीप धनखड भ्रष्ट आहेत. सन १९९६ च्या हवाला जैन प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. एवढेच नव्हे तर, त्याच्यांविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. जीटीएच्या तपासणीपूर्वी राज्यपालांच्या भेटीची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी कोणत्या लोकांना आपल्याबरोबर घेतले? याची चौकशी झाली पाहिजे. ते उत्तर बंगालमध्ये का गेले? आपण कोणाला भेटलात? भाजपचे आमदार,खासदार अचानक उत्तर बंगालमध्ये का गेले, अशी विचारणाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
राज्यपाल दार्जिलिंगला जाऊन भाजपच्या आमदार, खासदार यांना भेटले. ही मंडळी बंगालचे तुकडे करू पाहतायत. राज्यपालही त्यांच्या सामील असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच राज्यपाल मुद्दाम उत्तर बंगालला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यपाल लोकांना आंदोलन करायला लावतात, हे राज्यपालांचे काम आहे का, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
प. बंगालमध्ये सुरु असणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर धनखड यांनी वेळोवेळी ममता यांना झापले आहे तसेच राज्यातील वस्तुस्थिती केंद्रापर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे याचा राग ममता यांच्या मनात आहे. राज्यपालांनी घेतलेल्या कठोर भूमिकांमुळे ममता यांची देशपातळीवर नाचक्की झाल्याचे देखील पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा त्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या रडारवर राज्यपालांनाच घेतले असून त्यामुळेच त्या राज्यपालांना हटवण्याची भाषा करत असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर मग! यंदाचा टी-20 विश्वचषक युएईमध्येच
- टीम इंडिया श्रीलंकेत दाखल ; तीन दिवस राहणार विलगीकरणात
- औरंगाबादमध्ये मंगळवारपासून नवे नियम, शनिवार- रविवारी पूर्णपणे बंद!
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत, उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

