Share

अभिनेत्री विशाखा सुभेदारचा राज्यपलांच्या हस्ते सन्मान

Published On: 

मुंबई : अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने तिच्या विनोदी अंदाजाने अनेकांना निखळ हसण्यास भाग पाडले. यामुळे तिने लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. सध्या विशाखा कलर्स मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र अभिमानास्पद बाब म्हणजे नुकतेच तिला स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CQpfZrxpE7f/?utm_source=ig_web_copy_link

विशाखानं सोशल मीडियावर याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक भली मोठी पोस्ट लिहिली की, “प्रचंड आनंद झाला. आधी विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं. या पुरस्काराच्या निमित्तानं राजभवनात जाण्याचा योग आला. लेकाला बरोबर घेऊन गेले होते, नेमकं महेशला (पती) काम होत अन्यथा तो देखील आला असता. आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वाहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम, आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य.. “आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पहिल आणि भरून आलं..’

पुढे ती म्हणाली, ‘नवरा फोनवरून सतत संपर्कात तो हि जाम खुश, सासूबाई,जाऊबाई, आत्याबाई, नणंद बाई, भावंड, सगळ्यांसगळ्यांचे कौतुकाचे फोन मित्र मैत्रिणीचे फोन..शुभेच्छा वर्षाव.. खूप खूप शब्दात न सांगता येणारा न मावणारा आनंद झालाय.. मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांच, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या आणि सूर्यदत्त चे संस्थापक ह्यांचे देखील आभार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या देवाचे आभार’ अशी पोस्ट शेअर करुन विशाखानं आपला आनंद व्यक्त केला आहे.  तिच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

कोरोनामुळं राजभवनात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. विशाखासोबतच बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्‍छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती प्रदान करण्यात आले. हास्यजत्रा सोबतच विशाखाने झपाटलेला, येरेयेरे पैसा, येड्यांची जत्रा, अरे आव्वाज कोणाचा, मस्त चाललय आमचं, हृदयांतर, बीपी अशा बऱ्याच सिनेमांमध्ये देखील उत्तम काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!