🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मिडीयावर कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा आपल्या एका ट्विटमुळे अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस नेहमीच भाजपची बाजू घेत विरोधी पक्षातील नेत्यांसोबत पंगा घेत असतात.
नुकतंच अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मी मोदी भक्त असल्याचं म्हंटल आहे. अमृता फडणवीसांनी आपण मोदी भक्त असल्याचं स्पष्ट शब्दात मान्य केलं आहे. ट्विट करत त्यांनी लिहिलं, ‘हाँ ! मैं भक्त हूँ ! और मुझे गर्व है !, हो मी भक्त आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे’असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे.
हाँ ! मैं भक्त हूँ !
और मुझे गर्व है ! pic.twitter.com/I9oA0C0ZQy— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) June 28, 2021
सध्या केंद्र सरकारकडून जोमात लसीकरण सुरु झालं आहे. संपूर्ण भारतातील नागरिकांचं लसीकरण सुरु असून. त्यात आता 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. भारतात असंख्य लोक लस घेत आहेत. त्यामुळे लसीकरणाचे नवनवीन विक्रम तयार होत आहेत. भारतानं आता लसीकरणात अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. त्यामुळे आता भारत जगात सर्वात जास्त लसीकरण पूर्ण करणारा देश ठरला आहे. याचा अभिमान अमृता फडणवीसांना आहे म्हणून त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर मग! यंदाचा टी-20 विश्वचषक युएईमध्येच
- टीम इंडिया श्रीलंकेत दाखल ; तीन दिवस राहणार विलगीकरणात
- औरंगाबादमध्ये मंगळवारपासून नवे नियम, शनिवार- रविवारी पूर्णपणे बंद!
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत, उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
