मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासोबतच, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक उत्साही असताना लसींचा मुबलक साठा नसल्याने हिरमोड होत आहे. यावरून तीव्र नाराजी होत असून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं.
सुप्रीम कोर्टाने फटके मारले की काय होतं ते आज संध्याकाळी ५ वाजता बघितलं.
फटके खाणाऱ्याने वळ लपवायचा कितीही प्रयत्न करु दे.
— Dr. Nitin Raut ???????? (@NitinRaut_INC) June 7, 2021
मोदींच्या आजच्या संबोधनावर देखील विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. आता, काँग्रेस नेते व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोदींवर बोचरी टीका केली आहे. ‘सुप्रीम कोर्टाने फटके मारले की काय होतं ते आज संध्याकाळी ५ वाजता बघितलं. फटके खाणाऱ्याने वळ लपवायचा कितीही प्रयत्न करु दे,’ असा टोला नितीन राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वेळीच अक्कल आली असती तर गोंधळ टाळता आला असता’; जयंत पाटलांचा मोदींवर हल्लाबोल
- मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील जाणार पंतप्रधानांच्या भेटीला
- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना महा डीबीटी बियाण्यांची प्रतीक्षा, प्रशासनाचे मात्र शून्य नियोजन
- डेवॉन कॉनवेने पदार्पणातच मोडला ३९ वर्षापूर्वीचा विक्रम
- …त्यामुळे पेट्रोल-डीझेल दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही – पेट्रोलियम मंत्री


