मुंबई : २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले.
देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, पुन्हा तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे लशीच्या तुटवड्यावरून बहुतांश राज्यांमध्ये ओरड होत आहे. अनेक राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा काढल्या आहेत. मात्र, या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने आता विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे.
त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं. लसीकरणासंदर्भात उपस्थित झालेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील लस उत्पादन आणि लसीकरणाच्या वेगावरही सरकारची भूमिका मांडली. आता लसीकरणाची सर्वस्वी जबाबदारी केंद्राने उचलली असून केंद्र सरकारच लस खरेदी करून ती राज्यांना मोफत देणार असल्याची घोषणा देखील नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
देर आये दुरूस्त आये
This is exactly what the country had been demanding all along. A lot of ruckus and confusion could’ve been avoided if common sense struck in time. https://t.co/Pz0rn8bDFP
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 7, 2021
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या या घोषणेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून देर आये दुरूस्त आये, असा टोला लगावला आहे. ‘हीच मागणी संबंध देश करत होता. वेळीच अक्कल आली असती तर बराच गोंधळ आणि गोंगाट टाळता आला असता,’ असा प्रहार देखील जयंत पाटील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- कौतुक तर व्हायलाच पाहिजे : नितेश राणेंकडून मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमाकवच
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

