🕒 1 min read
नवी दिल्ली: सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत 2021-22 चे सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केले. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ जाहीर केली आहे. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली.
वाहन क्षेत्रासाठी वॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसी दीर्घकाळ प्रतीक्षित होती. आता खासगी वाहने 20 आणि व्यावसायिक वाहने 15 वर्षानंतर रस्त्यावर धडक मारणार नाहीत. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, बजाज ऑटो आणि अशोक लेलँड यांच्या शेअर्समध्ये 2% वाढ झाली अर्थमंत्र्यांनी ऑटो सेक्टरसाठी एक वॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केल्यानंतर केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक करताना सांगितले की,’ या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहनांच्या त्याचबरोबर रिसायकलिंगमुळे वाहनांच्या पार्टची किंमत कमी होईल, असे गडकरी म्हणाले.
या अर्थसंकल्पात स्टील सह धातूंवरील आयात शुल्क कमी करण्यात आले यावर बोलताना गडकरी म्हणाले की,’स्टीलवरील कमी होणाऱ्या आयात शुल्काचा परिणाम लवकरच दिसून येईल. येत्या 15 दिवसांत याविषयी सविस्तर माहिती येईल, या पॉलिसीमुळे ऑटो सेक्टरला फायदा होईल, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि स्टीलच्या वाढत्या किंमतींना आळा बसेल. ड्यूटी स्ट्रक्चरमध्ये बदल केल्यास स्टीलचे दर कमी होतील. ते पुढे म्हणाले की,’एमएसएमई क्षेत्रासाठी दुप्पट वाटप झाले आहे.’
महत्वाच्या बातम्या
- मनपा वॉर्ड आरक्षण सुनावणीसाठी ठरणार तारीख
- #Budget2021 : ‘मोबाईल महाग करुन सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे ऑनलाईन शिक्षणाचे माध्यम महाग केले’
- धक्कादायक! औरंगाबादेत पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
- अण्णांच वय झालंय त्यांनी आता निवृत्ती घ्यावी; ‘या’ नेत्याने दिला अण्णा हजारेंना सल्ला
- ‘अर्थसंकल्प ना ऐकला ना वाचला, राहुल गांधींचे राजकारण अगदीच बालिश’


