🕒 1 min read
नवी दिल्ली : सोमवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला. कोरोना नंतरचा अनेक अपेक्षा असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये विकासासाठी अनेक योजना आणण्यात आल्या असल्याच सत्ताधारी म्हणत आहेत. तर विरोधकांकडून मात्र या अर्थसंकल्पामध्ये अनेक त्रुटी असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार हल्ला चढवला आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. ‘चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आणि आमचे अनेक सैनिक शहीद झाले. पंतप्रधान फोटो ऑपसाठी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?; असे ट्वीट करत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांच्या टीकेवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पलटवार केला आहे. ‘राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प ना ऐकला ना वाचला,’ अशा शब्दात इराणी यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र डागले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी सारखा आनंद आणि प्रकाशाचा सण सीमेवर जवानांसोबत साजरा करतात. त्यावेळी जनतेचे प्रतिनिधी म्हणून ते जवानांना संदेश देतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत. जवानांप्रती असलेली देशव्यापी भावना व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान सीमेवर जातात. अशा मुद्द्यावर जर राहुल गांधी राजकारण करत असली तर हे अगदीच बालिश राजकारण आहे. मला वाटतं की पंतप्रधान मोदींच्या या कृत्याचा सर्व देशवासीयांना अभिमान असेल’, अस म्हणत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे.
दरम्यान, आरोग्य, आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, आकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास, मानवी संसाधनं, नवोन्मेश आणि ‘किमान सरकार कमाल काम’ हे या अर्थसंकल्पाचे सहा प्रमुख स्तंभ असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. राष्ट्र सर्वप्रथम, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण, पायाभूत आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, सुशासन, युवकांसाठी संधी, सर्वांसाठी शिक्षण, महिला सशक्तिकरण आणि सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही या अंदाजपत्रकातून अधोरेखित होते असा दावा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोहयो घोटाळा प्रकरणात ४७० जणांना नोटीसा; २० पथकांनी केली होती चौकशी
- #Budget2021 : मूठभर भांडवलदारांच्या हातात वीज क्षेत्र सोपविण्याचे मोदी सरकारचे कारस्थान : राऊत
- #Budget2021 : अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही; भुजबळांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
