Share

धक्कादायक! औरंगाबादेत पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद येथे एक गंभीर घटना घडली आहे. वैजापूरच्या शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या अंगावर वाहन घालून जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा प्रकार औरंगाबाद शहरातील सिडको चौकात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. सत्यजित ताईतवाले यांच्यावर मुकुंदवाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनूसार, ताईतवाले हे कुटुंबासोबत औरंगाबाद येथे राहतात. सध्या ते शिऊर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक आहेत. सोमवारी एका हॉटेलमध्ये गेले असता तिथे काही लोकांसोबत ताईतवाले यांचे भांडण झाले. यानंतर ते सिडको भागात गेले असता सहा हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत वाहन त्यांच्या अंगावर घातले. यात ते खाली पडले. यानंतर सहा जणांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

या घटनेत सत्यजित ताईतवाले गंभीर जखमी झालेत. माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!