सांगली:- केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली होती. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार असं चित्र निर्माण झालं होतं.
मात्र सरकारच्यावतीने केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानंतर अनेकांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली.
एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळवलं की त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काही अर्थ नाही. अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावे असे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वक्तव्य केले आहे.
काही वर्षांपूर्वी दिल्लीत रामलीला मैदानावर मोठं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाला काही प्रमाणात यश देखील मिळाले. पण आता अण्णा हजारेंच वय झाले आहे, असे म्हणत एकदा का पैलवानाने हिंदकेसरी पद मिळवलं की, त्या पैलवानाने पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काही अर्थ नाही असा दाखला देत अण्णांनी आता निवृत्ती घ्यावी असा सल्ला रघुनाथ पाटील यांनी दिलाय.
महत्वाच्या बातम्या
- रोहयो घोटाळा प्रकरणात ४७० जणांना नोटीसा; २० पथकांनी केली होती चौकशी
- #Budget2021 : मूठभर भांडवलदारांच्या हातात वीज क्षेत्र सोपविण्याचे मोदी सरकारचे कारस्थान : राऊत
- #Budget2021 : अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नाही; भुजबळांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
- पुणेकरांची घोर निराशा करणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प – कॉंग्रेस
- उपराष्ट्रपतींकडूनही रहाणेवर कौतुकाची थाप


