Share

“भीम” पडद्यावर साकारणारे प्रवीण कुमार होते गोल्ड मेडलिस्ट

Published On: 

मुंबई: बीआर चोप्रा यांच्या महाभारतात भीमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रवीण कुमार दीर्घकाळ आजार आणि आर्थिक संकटाशी झुंज देत होते. महाभारतात भीमाची भूमिका साकारून त्यांनी घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र प्रवीण कुमार सोबती हे केवळ अभिनेता नव्हते तर यांनी भारतासाठी गोल्ड मेडल सुद्धा जिंकले आहे.

प्रवीण कुमार सोबती अभिनेता होण्याआधी देशाचे स्टार अॅथलीट होते . १९६०-७० च्या सुमारास त्यांचे भारतीय ऍथलेटिक्समध्ये बरेच वर्चस्व होते. त्यांनी हॅमर आणि डिस्कस थ्रोवर अनेक वर्षे वर्चस्व गाजवले. प्रवीणने १९६६ आणि १९७० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २ सुवर्णपदके पटकावली होती. ज्यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ५६.७६ मीटरचा विक्रम सुद्धा केला होता.

प्रवीण यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले होते. त्यांना मैदानावर जेवढे यश मिळाले तसेच छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही सारखेच यश मिळाले. १९८१ मध्ये रक्षा या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, परंतु महाभारतातील भीमाची भूमिका साकारल्यानंतरच त्यांना अभिनेत्याच्या रूपाने ओळख मिळाली. या भूमिकेनंतर त्याला अनेक चित्रपटांमध्ये भूमिकांच्या ऑफरही आल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!