Share

चित्रा वाघ यांची महाराष्ट्र कॉंग्रेसवर टीका, म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. त्यात काल पासून अनेक दिग्गज खासदारांनी भाषण केले. काल  पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले होते . देशात कोरोना विषाणू पसरविण्यास काँग्रेस जबाबदार आहे. असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे.

महाराष्ट्रातील मजुरांना काँग्रेसने स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांना मोफत तिकिटे दिली असा आरोप मोदींनी केला. या त्यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील भाजप विरोधी नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्या वर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी माहाराष्ट्राचा अपमान करण्याचे काम सुरु केले आहे. शिवछत्रपती च्या महाराष्ट्राला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हा छत्रपती शिवाजी महराजांचा अपमान असून, कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर “पंतप्रधान माफी मांगो” आणि निषेधाचे फलक दाखवून आंदोलन करणार असल्याची घोषणा आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वाश्रमीच्या नेत्या आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज नाना पटोले आणि महाराष्ट्र काँग्रेसला लक्ष केले आहे. ”काल राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर बोलताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेलं मत कॉंग्रेसच्या भुमिकेविषयी होतं. मांडलेलं मत आणि महाराष्ट्राच्या अपमानाचा संबंध काय??अनिल देशमुख वसुलीकांड,अँटीलीया बॉम्ब प्रकरण, महिलांवर होणारे बलात्कार यात महाराष्ट्राची मान देशपातळीवर खाली गेली आहे. मात्र त्याच दुःख महाराष्ट्र काँग्रेसला झालेलं दिसत नाही. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

       महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!