🕒 1 min read
मुंबई: आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांचा (UP Election) पहिला टप्पा १० फेब्रुवारी पासून सुरू होतो आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेश निवडणुकांबाबत मतदारांना आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पक्षांतर्गत सभा झाली त्यातील निर्णय ते पत्रकारांना सांगत होते.
भाजपचे (BJP) सध्या सत्तेत असलेले सरकार हे, ED, इन्कम टॅक्स (Income Tax) , आणि मीडियाच्या आधारावर देशात दादागिरी आणि असंविधानिक कामे करत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकांत भाजप आणि RSS हे उभे असून त्यांचा दिल्लीत जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे आंबेडकर म्हणाले. जर २०२४ साली पुन्हा केंद्रात भाजप सत्तेत आली तर ते संविधान बदलण्याचे राजकारण सुरू करणार आहेत, किंबहुना त्यांनी सुरू केले आहे. २०२४ सालापर्यंत भाजप केंद्रात दिसू नये असे जर जनतेला वाटत असेल तर त्यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांत त्यांना रोखले पाहीजे असेही यावेळी आंबेडकर म्हणाले.
सध्याच्या उत्तर प्रदेश निवडणूका ह्या निवडणुका नसून संविधान (Constitution) वाचविण्याचा एक लढा आहे असे ते म्हणाले. प्रदेशात बहुजन समाज पार्टी (BSP) आणि चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) हे कमकुवत असून ते भाजप आणि RSS ला टक्कर देऊ शकत नाहीत. अश्यावेळी आपले खाजगी हेवेदावे बाजूला ठेवत सर्व आंबेडकरी चळवळी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही भाजप आणि RSS विरुद्धची लढाई लढली पाहीजे. उत्तर प्रदेशात आता जी लढाई आहे ती, समाजवादी पक्ष, त्यांचे सहयोगी पक्ष विरुद्ध भाजप आणि RSS अशी आहे.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) या लढ्यात पूर्ण पाठिंबा देत असून सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करते की, समाजवादी पक्षाला आपले बहुमोल मत द्या, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. संविधान वाचवायचे असेल तर या निवडणुकांत भाजपला मात देणे गरजेचे असून सर्व आंबेडकरी जनतेने समाजवादी पक्षाला मते देऊन ती दिली पाहीजे असे आंबेडकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Praveen Kumar Death : महाभारतात ‘भिम’ साकारणारे प्रवीण कुमार काळाच्या पडद्याआड
- “वॉर्नरला खरेदी करा तो चांगले रील बनवतो” ; चाहत्यांची राजस्थान संघाला अजब विनंती
- ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; अनेक मोठे खेळाडू यादीत
- वर्ल्डकप संघात निवड न झाल्याने “ही” महिला क्रिकेटर आता खेळणार हॉकी
- “शिवाजी पार्कला स्मशानभूमीमध्ये…”, लतादीदींच्या स्मारकाच्या वादावर आंबेडकरांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
