गोंदीया : वर्धा-देवळी मार्गावर २५ जानेवारी रोजी पुलावरुन गाडी कोसळून झालेल्या अपघातात आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. वर्धा-देवळी मार्गावरील सेलसुरा येथे पुलावरून झायलो ४० फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये भाजपा आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी आमदार रहांगडे यांच्या घरी भेट देत रहांगडे कुटुंबाचे सात्वन केले. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी व श्रीमती कांचनताई गडकरी यांनी गोंदियाचे आमदार श्री @MlaRahangdale जी यांच्या गोंदियातील खामरी येथील निवासस्थानी जाऊन रहांगडाले कुटुंबीयांचे सांत्वन केले. pic.twitter.com/Shktcb1rt0
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) January 30, 2022
वर्धा-देवळी मार्गावरीला हा अपघात खूप भीषण होता. गाडीतील सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच आपघातानंतर आमदार रहांगडाले यांना सांत्वनपर भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्या घरी भेट देत आहेत. रविवारी नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबियांची सपत्नीक भेट घेत सात्वन केले.
गडकरी आणि रहांगडाले कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळेच गडकरींना पाहताच विजय रहांगडाले यांना रडू अनावर झाले. विजय रहांगडाले यांची भेट घेतल्यानंतर गडकरींनी त्यांच्या पत्नीचेही सात्वन केले.
यावेळी गडकरी म्हणाले, अपघात कसा झालाय त्यासाठी चौकशी करण्यासाठी समिती तयार केली असून तांत्रिक कारण, तसेच रोड इंजिनियरचे कारण तर अपघातामागे नाही ना. त्याचप्रमाणे कार सदोष असल्यामुळे तर हा अपघात झाला नाही ना या सगळ्यांची चौकशीचे आदेश दिले आहेत. असे गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- आ. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक पोलिसांना शरण; राणेंवर अटकेची टांगती तलवार
- “सलमान हा अफझल खान तर मी छ.शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस… कोथळा बाहेर काढेन”
- माझा चेहरा शेवटचा बघा, असे वडिलांना म्हणत नवोदित मॉडेल्सची सहाव्या मजल्यावरुन उडी
- “अमृता फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्या फ्रस्टेशनमध्ये”, मनीषा कायंदेंची टीका
- औंरगाबादेत बॅनर लावून बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

