🕒 1 min read
जयपूर : राज्यस्थानमधील जोधपूर शहरात एका नवोदित मॉडल्सने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली आहे. त्यापूर्वी तीने आपल्या वडिलांना फोन करुन बाबा, माझा चेहरा शेवटचा बघून घ्या, असा संवाद साधला होता. गुनगुन उपाध्याय असे या मॉडेलचे नाव आहे. वडिलांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत तीने उडी घेतली होती. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत तीला दवाखान्यात दाखल केले.
गुनगुनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. जोधपूर शहरातील रातानाडा भागात रविवारी ही घटना घडली. गुनगुन ही थान भागात राहणारे व्यापारी गणेश उपाध्याय यांची मुलगी आहे. रविवारी रात्री ती हॉटेल लॉर्ड्समध्ये थांबली असताना हा प्रकार घडला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुनगुन उपाध्याय मॉडेलिंग करते. ती शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. जोधपूरला आल्यानंतर तिने वडिलांना फोन करुन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. फक्त माझा चेहरा पहा, असं तिने वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडील गणेश उपाध्याय यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
एसीपी देरावर सिंह यांनी फोन नंबरच्या आधारे गुनगुनचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर पोलीस रातानाडा परिसरातील हॉटेलवर पोहोचले. त्याआधीच गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली होती. खाली पडताच ती बेशुद्ध झाली, मात्र तिला तातडीने मथुरादास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, गुनगुनच्या छातीसोबतच तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. सध्या तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती समोर आलेली नाही. गुनगुन उंचावरुन खाली पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
-
“अमृता फडणवीस आमच्या सुनबाई”, ‘त्या’ ट्वीटवर नाना पटोलेंचे प्रत्युत्तर
-
राज्यात अनेक प्रश्न असून सरकारला केवळ मद्यविक्रीत रस- नवनीत राणा
-
“मुंबईत २५ वर्ष सत्ता असुनही शिवसेनेने रस्ते बांधले नाही, आता निवडणुकीसाठी…”
-
“…तर वाईन विक्रीचा निर्णय शेअरच्या किमती वाढवायला घेतलाय?”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
