Share

औंरगाबादेत बॅनर लावून बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ‘महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ अशा आशयाचे बॅनर लावलेल्या रमेश पाटलावर अखेर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या बॅनरवर शाईफेक करुन बॅनर फाडले होते. तसेच रमेश पाटलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

तीन आपत्य असल्याने महापालिकेची निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे निवडणूक उमेदवार बायको पाहिजे, असे मोठे बॅनर रमेश पाटलाने लावले होते. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले. महिलांनी यावर आक्षेप घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करुन घ्यावा लागला आहे. महिलांबद्दल अशा प्रकारे मजकूर लिहिल्याने हे प्रकरण त्याला चांगलंच आंगलट आलं आहे.

औरंगाबाद शहरात शनिवारी रात्री पासून लागलेल्या या बॅनरने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे बॅनर मोठ्या प्रमाणावर व्हायरल. ‘निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे’ शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मुख्यत्वे करून यामध्ये जातीची कुठलीही अट नसून आपल्याला तीन मुले असल्या कारणाने आपण निवडणूक लढवू शकत नाही त्यामुळे लढाऊ उमेदवार पाहिजे असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. रमेश विनायकराव पाटील यांनी शहरातील वर्दळीच्या तीन ठिकाणी हे बॅनर लावले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!