Share

आ. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक पोलिसांना शरण; राणेंवर अटकेची टांगती तलवार

Published On: 

🕒 1 min read

सिंदुधुर्ग : जिल्ह्यातील कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब अखेर कणकवली पोलिसांना शरण आले आहेत. तर नितेश राणे हे न्यायालयात शरण आले होते. याप्रकरणी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुणावणी होणार आहे. आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात नितेश राणे यांच्या याचिकेवर मागील आठवड्यात निर्देश देत १० दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टासमोर शरण जाण्यास सांगितले. राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने १० दिवस अटकेपासून संरक्षणही दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली होती. यावेळी त्यांचे बंधू निलेश राणेदेखील उपस्थित होते. नितेश राणे यांच्या बाजूने अॅड. सतीश मानशिंदे आणि अॅड. संग्राम देसाई यांनी बाजू मांडली. तर, सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांचे म्हणणे कोर्टाने मागवले होते. अॅड. भूषण साळवी यांनी ऑनलाइन सरकारी वकील म्हणून बाजू मांडली होती. मात्र, अॅड. प्रदीप घरत प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली होती.

सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत म्हणाले की, आमदार नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालय शरण आले आहेत. मात्र कस्टडीत का घेतलं नाही, यासंदर्भात आज मी कोर्टाच्या कामकाजात पाहणार आहे. सुनावणीसाठी जिल्हा सत्र न्यायालयात आमदार नितेश राणे हजर होणार आहेत. यावेळी त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!