Share

नीती आयोगाचा अहवाल जाहीर; महाराष्ट्रात ‘एवढी’ लोकसंख्या कुपोषित

Published On: 

मुंबई: नीती आयोगाने (NITI) नुकताच भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (National Multidimensional Poverty Index -MPI) अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार, सर्वाधिक लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा (Maharashtra) समावेश आहे. त्याच सोबत नीती आयोगाच्या या अहवालात देशातील टॉप पाच राज्यांमध्ये चार भाजपशासित राज्यांचा समावेश आहे.

नीती आयोगाने अनेक राज्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांचा समावेश अधिक असल्याचे देखील समोर आले आहे. त्याच सोबत महाराष्ट्र देखील या यादीत आहे. महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे. मात्र, हा आकडा गुजरातपेक्षा कमी आहे. गुजरातमध्ये ४१.३७ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहे. पश्चिम बंगालमध्ये ३३.६२ टक्के, कर्नाटकमध्ये ३३.५६ टक्के आणि तेलंगणात ३१.१० टक्के लोक संख्या योग्य पोषणापासून वंचित आहेत.

एखादं कुटुंब पोषणदृष्ट्या वंचित मानले जाते, जर त्या घरात ० ते ५९ महिने वयोगटातील कोणतेही बालक किंवा १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिला किंवा १५ ते ५४ वर्षे वयोगटातील पुरुष कुपोषित असल्याचे आढळते. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले, भारताच्या राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा (development in Multidimentional Poverty Index)) विकास हा सार्वजनिक धोरण लागू करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण योगदान आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!