कानपूर : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीतच शानदार शतक झळकावून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटची धमाकेदार शैलीत सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली (virat kohli)च्या जागी अय्यरचा समावेश करण्यात आला होता, मात्र दुसऱ्या कसोटीत कोहलीचे पुनरागमन झाल्याने अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विराटला पहिल्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली होती. मात्र, अय्यरच्या शतकानंतर इतर खेळाडूंवर स्वतःला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याचा दबाव वाढला आहे.
दरम्यान, अय्यरला कर्णधार कोहलीसाठी जागा सोडावी लागेल, असे टीम इंडियाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचे मत आहे. युवा फलंदाज अय्यरच्या शतकानंतर फलंदाजीत आपल्या फॉर्मशी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेवर दडपण असेल, असेही तो म्हणाला.
कानपूरमधील पहिल्या कसोटीच्या दुस-या दिवशी लंच ब्रेक दरम्यान लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, ‘त्याने ही कसोटी संस्मरणीय बनवावी अशी माझी इच्छा आहे कारण विराट कोहली एकदा परतला की तो खेळेल याची शाश्वती नसते. तो इलेव्हनमध्ये असेल. त्यामुळे, आशा आहे की तो त्याच्या पूर्ण क्षमतेने खेळेल आणि त्याचा पुरेपूर उपयोग करेल. अय्यरने पहिल्या डावात १७१ चेंडूंचा सामना केल्यानंतर १०५ धावांचे शतक झळकावले. यामध्ये त्याने 13 चौकार आणि दोन षटकार मारले.
माजी फलंदाज पुढे म्हणाला, ‘हो खूप मनोरंजक आहे पण या भारतीय संघात एक अलिखित नियम आहे जो आम्ही करुण नायरने त्रिशतक झळकावला आणि अजिंक्य रहाणे परतला तेव्हाही पाहिले, दुर्दैवाने नायरला बाहेर जावे लागले. त्यामुळे नेमके तेच होणार आहे. कोहलीला या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आल्यामुळे अय्यर खेळला. पण त्यामुळे अजिंक्य रहाणेवर मोठे दडपण असणार असल्याचे बोलले जात आहे. गेली काही वर्षे फार चांगली गेली नाहीत आणि तो त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी करत नाही. पण पुढच्या सामन्यात अय्यरला विराट कोहलीसाठी जागा सोडावी लागणार आहे हे निश्चित असल्याच माजी फलंदाजाने स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- खराब अंपायरिंगमुळे चाहत्यांना झाली कोहलीची आठवण; ट्विटरवर पडतोय मिम्सचा पाऊस
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर


