Share

‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शासनात विलिनीकरण या मागणीव्यतिरिक्त राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. पगारवाढ, वेतनहमी या बाबींची तजवीज केली आहे.परंतु त्यानंतर देखील काही कामगार संघटना अजूनही संपावर ठाम आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता कामावर रुजू न होणाऱ्या कामगारांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही काही कामगार संपाबाबत आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून एसटी कर्मचाऱ्यांचे पुढारी, भाजपा आणि सदाभाऊ खोत(Sadabhau Khot)-गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत या दोन पुढाऱ्यांनी भरघोस वेतनवाढीचे स्वागत करून संपातून माघार घेतली. भरघोस वेतनवाढ हेच संपकऱयांचे मोठे यश आहे, पण संप सुरू करतानाच कधी व कुठे माघार घ्यायची, हे ज्यास कळते तोच कामगार नेता. कामगारांचा पुरता विध्वंस झाला तरी चालेल, कामगारांच्या संसाराच्या होळ्यांवर आपली चूल पेटविणारे पुढारी या संपातही दिसत आहेत. एखाद्याने अंगावर काळा कोट चढविला व राज्यकर्त्यांवर असभ्य, एकेरी भाषेत हल्ला केला म्हणून आपणच नेते या भ्रमात जे लोक आहेत, त्यांनी कामगारांना संकटाच्या खाईत ढकलू नये.’

दरम्यान, पुढे भाजपवर निशाणा साधत राऊत म्हणाले की,’गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. “खोत व पडळकर या पुढाऱ्यांचा तसा एस.टी. कामगारांशी संबंध नव्हता. तरीही ते संपकऱ्यांत घुसले, पण संप हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात. तरीही हे शहाणपण महत्त्वाचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीलाच समंजसपणाची भूमिका घेतली असती, तर एस.टी. कर्मचाऱ्यांचे असे हाल झाले नसते.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!