Share

‘हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतल्यास काहींना त्रास होणारच’, निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना टोला

Published On: 

मुंबई : संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली होती. मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली होती. त्यावर भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत निलेश राणे ट्विट करत म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे विसरल्या संविधान बदलत असतं ज्याला अमेंडमेंट म्हणतात. आपण कायदे बनवायला आणि बदलायला खासदार झाल्या आहात. आपण इतके वर्ष जे बदल सुचवले त्याने संविधान बदललं असं म्हणायचं का? हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतले तर काहींना त्रास होणारच, पण बोलायचं म्हणून काही बोलू नका. असे प्रत्युत्तर निलेश राणेंनी सुप्रिया सुळेंना दिले आहे.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, मोदी सरकार संविधान बदलू पाहत असून भाजपाला जोरदार विरोध करा. तरच देश वाचेल. संविधान जात, धर्म किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरुपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. संविधान वाचलं तरच देश वाचेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!