मुंबई : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक असेलेला सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) स्टारर ‘ अँटिम : द फायनल ट्रुथ’ (Antim) शुक्रवारी पडद्यावर आला आणि बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. थिएटर्स सुरू झाल्यामुळे आणि प्रेक्षक येऊ लागल्याने, बॉलीवूड चित्रपट पुन्हा मोठ्या कमाईकडे परतले आहेत. त्याचप्रमाणे ‘अंतिम’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, ‘अंतिम’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जवळपास ४ कोटी ५० लाख रुपयांचा गल्ला चित्रपटाने कमावला आहे. चित्रपटाने चांगली ओपनिंग केल्याचे म्हटले जात आहे. आता विकेंडला चित्रपट किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. याबद्दल चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी देखील अंतिम चित्रपटाचा रिव्ह्यू ट्वीट केला आहे. त्यांनी ‘अंतिम’ चित्रपटाला ३.५ स्टार दिले असून चित्रपटातील सलमान, आयुषच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
#OneWordReview…#Antim: POWER-PACKED.
Rating: ⭐️⭐⭐½
A gangster drama that keeps you hooked for most parts… Although it banks on an oft-repeated plot, the twists and turns + #SalmanKhan’s character + #AayushSharma’s act + stunning finale are aces. #AntimReview pic.twitter.com/Fr0ialTW75— taran adarsh (@taran_adarsh) November 26, 2021
बहुप्रतिक्षित महेश मांजरेकर दिग्दर्शित गँगस्टर ड्रामा, ‘अंतीम’ ज्यामध्ये आयुष शर्मा आणि सलमान खान यांचा समावेश असून देशभरात ३,५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ सह बहुतेक स्क्रीनवर १:१ च्या प्रमाणात शो शेअर करत आहे .‘अंतिम’ हा चित्रपट २६ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. तर चित्रपटात सलमान खान सरदार पोलिसाच्या भूमिके तसेच आयुष एका वेगळ्या भूमिकेत दिसला आहे. सध्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर


